महागाई भत्ता वाढला म्हणजे आता नक्की किती पगार मिळणार?
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 40 हजार रुपये असेल आणि त्याच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ झाली. तर त्याच्या पगारात 1,200 रुपयांची वाढ होईल. शिवाय कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. या प्रकारे त्यांना 3,600 रुपयेही मिळतील.
सोलापूर: मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
मोहोळ विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, आचार संहिताचा भंग करणाऱ्या वर थेट कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रक्रियेतील उमेदवाराने त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचे तीन वेळा
प्रसिद्धीकरण करणे गरजेचे असल्याची माहिती निवडणूक
निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती सीमा होळकर यांनी दिली. मोहोळ विधानसभा मतदारसंघात एकूण 146 गावांचा समावेश असून, 336 मतदान केंद्रे आहेत. 3 लाख 29 हजार एकूण मतदार आहेत.
शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात- जरांगे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचं ठाम आश्वासन दिलं. महायुतीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी दसरा मेळाव्यात शपथ घेतल्यानंतर तात्काळ मराठा आरक्षण दिल्याचं सांगितलं आणि विरोधकांवर टीका केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर शिंदेंनी सल्ला देत, महायुतीने दिलेल्या सवलतींचा विचार करावा असं म्हटलं. जरांगेंनी यावर प्रतिक्रिया देत, शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात आणि तेवढेच धाडसी आहेत, असं मत व्यक्त केलं.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल: ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर ट, करत म्हटले आहे की, या योजनेमुळे राज्य कंगाल होईल. फुकट पैसे वाटून काहीही साधता येणार नाही. राज ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, आर्थिक मदतीच्या योजनेतून दीर्घकालीन उपाययोजना न करता फक्त तात्पुरती सोडवणूक केली जात आहे. लोकांच्या आर्थिक स्थितीच्या सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील, असं राज ठाकरे म्हणाले.
शाळेतील डिजिटल शिक्षण: नवीन युगाची सुरुवात
शिक्षण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराने नवीन युगाची सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीनंतर अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण पद्धत स्वीकारली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या ट्रेंडमुळे शिक्षणातील असमानता कमी झाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी मिळत आहे. शाळांनी स्मार्ट कक्ष, ई-लर्निंग साधने आणि इंटरेक्टिव्ह प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढवला आहे. तथापि, याबरोबरच इंटरनेट साक्षरतेवर भर देणे आवश्यक आहे.