Fiverr

Saturday, November 16, 2024

Breking news today

 केंद्र सरकारचा टोल टॅक्ससाठी नवा नियम लागू

केंद्र सरकारने टोल टॅक्ससाठी नवा नियम लागू केला आहे, ज्याचा कोट्यवधी वाहनधारकांना फायदा होणार आहे. नवीन नियमांनुसार, 20 किमीपर्यंत राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गांचा वापर करणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही. मात्र, यासाठी वाहनावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) असणे बंधनकारक आहे. सध्या GNSS प्रणाली पायलट प्रोजेक्टअंतर्गत कर्नाटक आणि हरियाणामध्ये लागू आहे. यशस्वी चाचणीनंतर देशभर ही प्रणाली राबवली जाईल. यामुळे टोलमध्ये पारदर्शकता येणार असून वाहनचालकांचा प्रवास सुकर होईल.


सोलापुरातून मुंबई, गोव्याला जाता येणार विमानाने



सोलापुरातील होटगी रस्त्यावरील विमानतळावरून येत्या सात दिवसांमध्ये मुंबई आणि गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार असल्याच्या माहितीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीकडून ही सेवा सुरू होणार आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीकडून सोलापूर ते पुणे आणि सोलापूर ते मुंबई पहिल्या टप्प्यात विमान सेवा सुरू करण्याची तयारी होती. मात्र पुणेपेक्षा, मुंबई, गोवा, हैदराबाद, तिरुपती, बंगळुरू या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची मागणी सोलापूरकरांनी केली आहे.


ऐन थंडीत वाढतोय उकाडा!



मुंबई शहर आणि उपनगरात 16 नोव्हेंबर रोजी थंडीच्या दिवसात तापमानात वाढ झाली आहे. आज मुंबईचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईत उष्णता आणि आर्द्रतेचा प्रभाव दिसून येत आहे. शहरातील हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


दुसऱ्याच कोणी तुमच्या नावावर मतदान केल्यास
काय कराल?



भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम -1961 च्या 49P या कलमानुसार, तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणी तुमच्या नावावर मत नोंदवले असेल आणि खरे तुम्ही मतदार असाल तर तुम्ही मतदार केंद्राच्या पीठासीन अधिकाराकडे अपील करू शकता.अर्थात, तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्राच्या स्लिप अशी कागदपत्रे असायला हवीत.



मतदान कार्ड कसे डाऊडलोड कराल?


सर्वात प्रथम राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर WWW.ECI.GOV.IN वर जा. त्यात मेन्यूमधील डाऊनलोड e-Epic निवडा. खाली स्क्रोल करुन सर्व्हिस सेक्शनमध्ये जा. त्याखाली e-Epic डाऊनलोडवर क्लिक करा. तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर, ईमेल किंवा EPIC नंबर आणि कॅप्चा कोर्ड भरल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करावं लागेल. लॉगइन करून डाऊनलोड EPIC वर क्लिक

करा.


व्होटर आयडी हरवलंय? काय कराल?



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला आता केवळ चार दिवस उरले आहेत. घरोघरी मतदानासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव सुरु आहे. पण तुमचं व्होटर आयडी हरवलं असेल तर अगदी काही मिनिटांमध्येच तुम्ही हे ओळखपत्र डाऊनलोड करु शकता. फक्त त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. या फोनमध्येच तुम्ही मतदान ओळखपत्राची डिजिटल कॉपी डाऊनलोड सेव्ह करू शकता.



दिव्यांग मतदारांना मतदानासाठी हा पर्याय



दिव्यांग मतदार मतदानासाठी 'सक्षम' मोबाईल अॅपचा लाभ घेऊ शकतात. 'सक्षम' मोबाईल अॅप दिव्यांगांसाठीच सुरू करण्यात आले आहे, त्यावर लॉग इन करून ते मतदान करू शकतात. उमेदवारांसाठी 'सुविधा' नावाचे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, हे ऑनलाइन पोर्टल असून तेथे नामनिर्देशन आणि शपथपत्रही दाखल करता येते. मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, 'सुविधा' पोर्टलचा वापर उमेदवारांना सभा आणि रॅलींसाठी परवानगी घेण्यासाठी देखील करता येतोय.


पीएम इंटर्नशिप योजना, महिना 5 हजार, शेवटची संधी



पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत आहे. या योजनेतून प्रत्येक तरुणाला इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी 800 पेक्षा जास्त कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी केलेली आहे. या योजनेत पात्र उमेदवाराला सुरुवातीला एक रक्कमी 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. तर त्यानंतर प्रत्येक महिना 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. 10 वी पासून ते पदवीधरांपर्यंतचे सर्वजण यासाठी अर्ज करु शकतात. https://pminternship.mca.gov.in/login / या लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता


राज्यात 158 पक्ष निवडणूक रिंगणात



राज्याच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. अनेक पक्ष पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरले आहेत. मात्र या निवडणुकीत किती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्हाला माहिती आहे का? तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एक दोन नव्हे तर तब्बल 158 राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात अनेक राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांचा समावेश आहे. सत्तेच्या सारीपाठासाठी प्रत्येक पक्षाची धरपड सुरू आहे.


सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त


गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. गुरुवारीही (14 नोव्हेंबर) सेन्सेक्स निफ्टीने जोरदार सुरुवात केली आणि काही वेळाने पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र केवळ शेअर बाजारच नाही तर सोन्यामध्येही सातत्याने घसरण होत आहे. 1 नोव्हेंबरपासून सोन्याचे दर 5000 रुपयांनी घसरले आहेत, म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे. MCX वर सोन्याच्या भावातील बदल पाहिल्यास, गुरुवारी सोने 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले.


तुम्ही शाई वापरण्यास नकार देऊ शकता का?







जर मतदाराने सूचनांनुसार डाव्या बोटावर शाई लावण्यास नकार दिला किंवा त्यांच्या बोटावर आधीच शाईचं चिन्ह असेल तर त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली जात नाही. मतदाराने शाईची खूण काढण्यासाठी काही केले तर त्यांना मतदान करण्यापासूनही रोखले जाते. बोटात तेलकट किंवा स्निग्ध पदार्थ असल्यास अमिट शाईचे चिन्ह तटस्थ करण्याच्या उद्देशाने अधिकारी प्रथम बोट स्वच्छ करतात आणि नंतर शाई लावतात.


Taykvando2024 :राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरचा डंका..


 राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरचा डंका..


मध्यप्रदेशातील विदिशा येथे झालेल्या68व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरच्या विद्यार्थी शालिनी चंदनशिवे हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.प्रथम क्रमांक पटकावून तिने सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली आहे.शालिनीने राष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याचे नाव झलकवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मध्यप्रदेश येथील विदिशा येथे 68 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा पार पडली यामध्ये सोलापूरची शालिनी चंदनशिवे हे निश्चित 24 ते 26 किलो वजनी गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.

फिटनेस अकाउंट वर स्पोर्ट्स क्लब आणि ती महाराष्ट्राकडून शालिनी अण्णासाहेब चंदनशिवे हिचे स्वागत रेल्वे स्टेशनवर जोरदार करण्यात आले सोलापूर शहरातून प्रथमच राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून पदक विजेते खेळाडू म्हणून सोलापुरातील पहिलीच राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू ठरली आहे.

याच बरोबर तिने सर्व प्रथम सोलापूर महानगरपालिका कडून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरावर सुद्धा Taykvandoस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता.

या विजयामुळे सर्वच तायक्वांदो स्पोर्ट क्लब चे पदाधिकाऱ्यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. शालिनी हिला असिफ शेख, मनोज जाधव ,स्वप्निल फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



तायक्वांदो (कराटे)क्लास साठी संपर्क...

आसिफ शेख सर -9175400212

मनोज जाधव सर-8421710075








Friday, November 15, 2024

Today news:10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच 2025 साठी 10वी आणि 12वीं बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. परीक्षांचा कालावधी 11 फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान असणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतील. वेळापत्रकात सर्व विषयांचे दिवस, तारखा व वेळा दिल्या आहेत. एसएससी, एचएससी बोर्डाचे परीक्षेचे वेळापत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटवर उपलब्ध होईल. यासंबंधी अधिक माहितीसाठी mahahsscboard.in ला भेट द्या.



राज्यातील शाळांना 3 दिवस सुट्ट्या



राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यामुळे 18, 19 व 20 नोव्हेंबर रोजी शिक्षक निवडणूक कर्तव्यात सहभागी असतील. यासाठी शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. मतदान केंद्रे शाळांमध्ये असतात व निवडणुकीसाठी शाळा ताब्यात घेतल्या जातात. परिणामी शिक्षण विभागाच्या उपसचिव तुषार महाजन यांनी संबंधित शाळा बंद ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांना आवश्यक ती परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील शैक्षणिक प्रशासन सुलभ करण्यासाठी मोठा निर्णय



राज्यातील शैक्षणिक प्रशासन सुलभ करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विविध विभागांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांचे व्यवस्थापन शालेय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये आदिवासी आश्रमशाळांचा समावेश असून, या शाळांच्या व्यवस्थापनातील गुणवत्ता आणि नियोजनातील त्रुटी दूर होण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असून, लवकरच अधिकृत प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.




2025 मध्ये स्मार्ट फोन्सच्या किंमती वाढणार



2025 मध्ये AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहेत. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, स्मार्टफोन्सची जागतिक सरासरी विक्री किंमत 5 टक्क्यांनी वाढेल. जनरेटिव्ह AI, पॉवरफुल प्रोसेसर आणि प्रिमियम कॅमेऱ्यांसाठी कंपन्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन्स अधिक महाग होतील. AI तंत्रज्ञानाचे वेगाने एकत्रीकरण होत असल्याने ग्राहकांना हे फीचर्स महागात पडणार आहेत, आणि त्यामुळे आगामी स्मार्टफोन अधिक प्रिमियम असतील.


डिजीटल मतदान कार्ड कसं डाऊनलोड करायचं? 



सर्वप्रथमhttp://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा. तिथे रजिस्ट्रेशन करा. लॉगीन करुन e-pic चा पर्याय निवडा. तुमचा मतदार क्रमांक टाका. मोबाईलवरील ओटीपी जमा करून डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता. ज्या मतदारांचे मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये वेगळे असतील आणि सध्या ते दुसरा क्रमांक वापरत असतील तर अशावेळी केवायसी प्रक्रिया निवडावी लागते. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोबाईलनंबर अपडेट करु शकता. त्यानंतर डिजीटल मतदार कार्ड डाऊलोड करु शकता.



२८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १३६ उमेदवार



राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत. या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवार ही निवडणूक लढवणार आहेत. त्यामध्ये ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.


निवडणूक आयोगाची कामं काय असतात?



राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी आहे. यादरम्यान, निवडणुक आयोग कोणती कामं करेल? 1.मतदार याद्या तयार करणं, त्या अद्ययावत करणं, मतदार ओळखपत्रं जारी करणं.

2. निवडणुकांचं नियोजन, वेळापत्रक तयार करणं, उमेदवारी अर्जांची छाननी, मतदानाच्या दिवशीचं नियोजन, निवडणूक निकाल जाहीर करणं.

3. राजकीय पक्षांना मान्यता देणं किंवा त्यांची मान्यता रद्द करणं, राजकीय पक्षांना चिन्हवाटप करणं, 4.निवडणुकीसंदर्भातील वाद सोडवणं..


गुंतवणुकीचे 'हे' जबरदस्त पर्याय माहिती आहेत का?


भारत सरकारने मुलांच्या भविष्यासाठी "एनपीएस वात्सल्य" योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये आई-वडील 1000 रुपयांपासून बचत करू शकतात. ही योजना दीर्घकालीन मार्केट लिंक्ड गुंतवणूक असून मोठ्या रिटर्न्सचे आश्वासन देते. तसेच, मुलांसाठी गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणारा एक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. गोल्ड ईटीएफ कमी जोखमीचा असतो आणि सोन्याच्या भाववाढ़ीमुळे जास्त नफा मिळवता येतो. हे दोन्ही पर्याय मुलांच्या आर्थिक भविष्यविषयक सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहेत.


पोस्टल मतदान करण्याचा अधिकार कोणाला?



महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. पण यामध्ये मतदान केंद्रांवर मतदान न करता काही मतदारांना पोस्टल मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. RPA, 1951 च्या कलम 60 (c) अंतर्गत यात विशेष मतदार, सेवा मतदार आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांसह 85 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, किमान 40% अंपगत्व, कोविड बाधित नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. परंतू, पोस्टल मतदानासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना निश्चित कालावधीत रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज सादर करणं आवश्यक आहे. 

सोलापूर: 109 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा अधिकार



तालुक्यातील ज्येष्ठ मतदारांच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली 85 वयापुढील वृद्धांसाठी निवडणूक कर्मचारी घरी जाऊन मतदानाचा हक्क बजावून घेत आहेत. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून ही यंत्रणा सुरू केली आहे. घरी जाऊन मतदान यंत्रणेच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, वैराग भागातील 109 वर्षाच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. सोनाबाई भगवान जाधव असं या आजीबाईचं नाव असून सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केलंय.



बादाम खाल्ल्याने शरिर बनते मजबूत


रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे: बादामामध्ये मॅग्नेशियम असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी बादामाचे सेवन लाभदायक ठरते.

केसांसाठी पोषक: बादामामध्ये असलेल्या प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी होते. केस अधिक घनदाट आणि निरोगी राहतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे: बादामातील मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी नियमित बादाम सेवन फायदेशीर ठरते.


Thursday, November 14, 2024

Information of elections: निवडणुकीयंत्रणाबद्दल थोडीशी माहिती

 महाराष्ट्राची ही कितवी विधानसभा निवडणूक?

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1962 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुका राज्यात झाल्या. त्यावेळी 264 पैकी 215 जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकल्या होत्या. आता 20 नोव्हेंबर 2024 ला 15व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी यंदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या प्रतिस्पर्ध्यांमध्ये विधानसभेची लढत होणार आहे.


जगातील पहिलं निवडणुक चिन्ह कोणतं आणि ते कोणाला दिलं?

कुठलीही निवडणूक असली की निवडणूक चिन्हं ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणूक चिन्हापुढील बटण दाबूनच आपण कोणत्याही उमेदवाराला मतदान करतो. मात्र जगातील पहिलं निवडणूक चिन्ह कोणत्या पार्टीला आणि कधी दिलं गेलं? तर 234 वर्षांपूर्वी अलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत फेडरलिस्ट पार्टी हा पहिला संघटित राजकीय पक्ष स्थापन झाला. या पक्षाचे चिन्ह गोलाकार अंगठी होते. हे जगातील पहिले निवडणूक चिन्ह. येथूनच जगभरातील संघटित पक्षांमध्ये निवडणूक चिन्हांची प्रक्रिया सुरू झाली.


महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 24 मतदारसंघ कसे वाढले ?

राज्यातील 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे मतदान होणार आहे. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत राज्याच्या मतदारसंघात तब्बल 24 मतदारसंघ वाढले आहेत. स्वतंत्र महाराष्ट्रातल्या पहिल्या निवडणुकीत 264 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली होती. पुढे मतदसंघ पुनर्रचना करण्यात आली. आणि महाराष्ट्रातील मतदार संघांची संख्या 288 एवढी झाली.


मतदार यादीत नाव कसं शोधाल?

विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून आपलं नाव मतदार यादीत आलय का हे तपासण्याची वेळ आता आली आहे. भारतीय निवडणूक आयोग त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांमधून त्या त्या मतदारसंघातील मतदारांची

यादी जाहीर करत असतं. यासाठी https://voters.eci .gov.in/download-eroll या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचं राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि इतर तपशील भरून मतदारयादीत तुमचं नाव आहे का हे तपासता येईल.


EVM मशीन कुठे बनते?

गेल्या दशकभरातील अशा किती निवडणुका असतील ज्यामध्ये हारल्यावर EVM वर खापर फुटलं नसेल? 1982 मध्ये सर्वात पहिल्यांदा केरळच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये EVM मशीनचा वापर झाला. मतपेटीत मतदानाची चिठ्ठी टाकण्याऐवजी पहिल्यांदाच बटण दाबून मतदान झाले. पण ही मशीन तयार कुठे होते? पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैदराबादला त्याची रचना आणि विकास करण्याचे काम सोपवण्यात आले. नंतर भारत इलेक्ट्रॉनिक लि, (BEAL) बंगळुरुमधील सहकारी संस्था निवडली गेली.



सर्वाधिक मते NOTA ला मिळाली तर काय होते?

अनेकदा मतदारांना प्रश्न पडतो जर एखाद्या मतदारसंघात NOTA या पर्यायाला कुठल्याही इतर उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली तर काय होते? जर असे झाले तर दुसऱ्या क्रमांकाची मते ज्या उमेदवाराला मिळाली आहेत त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येते. NOTA या पर्यायाला कोणतेही निवडणूक मूल्य नसून पक्षांना सक्षम उमेदवार देण्याकरता दबाव टाकण्यासाठी नोटाची तरतूद करण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार हा वैधानिक असून संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे.


भारताव्यतिरिक्त कोणत्या देशात EVM वापरली जातात?

भारतात निवडणुकीत मतदानासाठी आधुनिक EVM मशीन वापरली जातात. आतापर्यंत EVM मशीन्स देश पातळीवरील 3 निवडणुकांत आणि राज्यातल्या 113 निवडणुकांमध्ये वापरली गेली आहेत. मात्र भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये ही EVM मशीन्स वापरली जातात. आजघडीला सुमारे 33 देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान होतं. यात व्हेनेझुएला, अर्जेंटिना, इराण, अमेरिका यासारख्या अनेक देशांमध्ये EVM वापरलं जातं.


पहिल्यांदा मतदान करताय? मतदानकेंद्रावरील 'या' प्रक्रिया लक्षात ठेवा..

राज्याच्या विधानसभांचं मतदान 20 नोव्हेंबरला आहे. अनेकजण यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतदानकेंद्रावर जाऊन गोंधळ होऊ नये यासाठी काही प्रक्रीया लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

1. मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर तीन अधिकारी बसलेले असतात. मत देण्यासाठी नंतर बोटाला शाई लावण्यासाठी या अधिकाऱ्यांकडे जावे लागते.

 2. दुसरी पायरी म्हणजे मतदार यादीतून मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा देणे. 

3. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन EVM वर उपलब्ध यादीतून राजकीय पक्षाला निळे बटण दाबून मत द्यायचे असते. 4. मत दिल्यानंतर EVM वरचा LED लाल होतो. आणि मतदान झाल्याची पुष्टी करणारी स्लिप तयार होते.



भारतात मतदानाची शाई कोण बनवतं?

भारतात मतदान झाल्यानंतर बोटाच्या तर्जनीला लावली जाणारी साई ही भारतातच तयार होते हे तुम्हाला माहित आहे का? 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर झाला. कर्नाटकातील म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड या कंपनीत निवडणुकीची ही शाई तयार केली जाते. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या संस्थेकडे आपल्या election ink चे अधिकृत लायसन्स आहे. या शाईची कुठेही विक्री केली जात नाही. फक्त सरकार आणि निवडणुकीशी संबंधित यंत्रणांना त्याचा पुरवठा केला जातो.


आचारसंहिताची सुरुवात कशी झाली?

राज्यात किंवा देशात कुठलीही निवडणूक असली की आचारसंहिता लावली जाते. या आचारसंहिताची सुरुवात 1960 साली केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली. तेव्हा राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कुठल्या नियमांचे पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवले. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकांत आचारसंहिताची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले. निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही. परंतु आचारसंहितातील काही नियम आयपीसीच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात.


महाराष्ट्रातील 288 पैकी किती मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यातील एकूण 288 मतदारसंघांपैकी 29 मतदार संघ हे अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत. 25 मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. तर उरलेले 234 मतदार संघ हे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत. राखीव असणाऱ्या या 54 मतदारसंघांमध्ये त्या त्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी देता येते.


मतदाराला NOTA वापरण्याचा अधिकार कधीपासून?

27 सप्टेंबर 2013 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना त्यांचं मत देताना 'वरीलपैकी काहीही नाही' म्हणजेच NOTA वापरण्याचा पर्याय असावा असा निर्णय दिला. यासाठी निवडणूक आयोगाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM) या पर्यायासाठी एक बटन अनिवार्य करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे निवडणूक आयोगानं नोटा हे चिन्ह सर्व EVM मशीनच्या शेवटच्या बटनावर लावण्यात आले.


Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...