Which certificate is required for college admission? |कॉलेजात घेताय ना प्रवेश मग काढले आहे का प्रमाणपत्र?
Which certificate is required for college admission? |
👉उत्पन्न दाखला
शिष्यवृत्ती चा लाभ आर्थिक कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना मिळत असतो यासाठी तलाठ्याकडून उत्पन्नाचा दाखला आणावा लागत असतो त्यानंतर तहसीलदाराकडून पक्के प्रमाणपत्र संबंधितांना चार ते पाच दिवसात ऑनलाईन प्राप्त होते.
👉शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्र
मित्रांनो आरक्षित कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी तसेच शिष्यवृत्तीसाठी ही हा दाखला महत्त्वाचा ठरतो. यासाठी महा-ई-सेवा केंद्रावर संपर्क साधून हे प्रमाणपत्र काढता येते. आणि हे खूप गरजेचे कागदपत्र आहे.
👉रहवासी दाखला
विविध अभ्यासक्रमासाठी रहिवासी प्रमाणपत्र मागविले जात असते महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन या संदर्भातील प्रमाणपत्र ही काढता येते कागदपत्रे व अर्ज भरून त्यानंतर हे प्रमाणपत्र प्राप्त होते.
👉जात पडताळणी प्रमाणपत्र:
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जात पडताळणी प्रमाणपत्र हे सर्वात महत्त्वाचेकागदपत्रापैकी एक आहे.बारावीनंतर काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी पडताळणी कार्यालयाकडे अर्ज करून घेणे गरजेचे आहे.
👉शासन आपल्या दारी उपक्रम
मित्रांनो, पूर्वी दाखले प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू कार्यालयात येशील कार्यालय येथे गर्दी होत होती आता मात्र ही महा सेवा केंद्रावर ही गर्दी दिसून येत आहे पालक व विद्यार्थी शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे आपल्याला खूप मोठी मदत होत आहे.
No comments:
Post a Comment